ती जेव्हा हसायची , गोड दिसायची !
वाटायचा तो वळिवांत न्हाला !!
पावसात भिजला , पावसात भिजला !!
हिरव्या त्या पात्यांपरी फिरूनी मातीत रुजला !
पावसात भिजला !!
कॉलेजात येताना ती सजायची ,
पाहून त्याकडे कशी लाजायची ,
गालातल्या गालात तोही हसायचा ,
मग तिच्यासाराखा तोही गोड दिसायचा -
शब्दप्रेरणा मानायचा तो तिजला !!१!! पावसात भिजला !!
तिच्याचसाठी कविता तो लिहायचा ,
प्रेमाने हृदयी तिच्या वहायचा ,
इतकी ती त्याच्या शब्दावरती मरायची ,
आत्म्यापासून वाह !अशी म्हणायची ,
समजायचा गालात तोही लाजला !!२!!पावसात भिजला !!
मना मोहणारा तिचा गंध तो ,
बनला त्याच्या कवितेचा छंद तो ,
सारखातो तिच्याकडे पहायचा ,
तो त्याच्यामध्ये कुठे रहायचा ?
हळू हळू तोही तिच्या प्रेमात पडला !!३!!पावसात भिजला !!
म्हणायचा तू डोळ्यांपुढती नसतांना -
दिसते माझी कविता मजसी रुसताना ,
विचारतो सखे माझी होशील का ?
शब्दांना सूर तुझा देशील का ?
जीवनातला हर्ष खरा आहे तू मजला !!४!! पावसात भिजला !!
साधं सुधं होतं ते कुणब्याच पोरं ,
लेक ती श्रीमंताची मोठं तीच ते घर !
परीस्थीती दोघांची नव्हती समांतर,
असे ते जन हो दोघात पडले अंतर ,
कवी तो फक्त तिच्या आठवांत जगला !!५!!पावसात भिजला !!
दुष्काळाला त्याच्या पर्जन्य होती ,
त्याच्या प्रतिभेसाठीचे चैतन्य होती ,
कशी ती सजणी त्याची त्याला भूलून गेली ?
संसारी तिच्या तीही रमून गेली -
पण प्रेम दिवा मनातील त्याच्या कधी न विझला !!६!!पावसात भिजला !!
ती जेव्हा हसायची ,गोड दिसायची -
वाटायचा तो वळिवांत न्हाला !!
हिरव्या त्या पात्यांपरी फिरूनी -
तोही जगत राहीला तोही उगत राहीला !!
--उषातनय
व्वा!!!!! अगदि सुंदर
उत्तर द्याहटवाThis is one of my favorite poem of yours..
उत्तर द्याहटवाToo good...
Simply great..
so great
उत्तर द्याहटवाkon aahe hi mulgi jara kalel kaa aamhaalaa??