शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २००९

मी पाण्याच्या ...

मी पाण्याच्या थेम्बापरी पडू कशाला ?
नाही काही माझे मग रडू कशाला ?
धाव घेती माझ्याकडे कोटी किरणे ती -
असूनी उजेड तमात दडू कशाला ?
रात जाईल तो दिवस येईल पुन्हा -
सुखाचे मग प्रेत करून गाड़ू कशाला ?
जीवन म्हणजे आहे नुसता प्रवास -
नसता कारण उगा लढू कशाला ?
देणगी निसर्गाची सौंदर्य आहे ती -
शोभत नसता मग मढू कशाला ?
प्रेमातच आहे मी देवही म्हणाला -
जगा अर्पीताना अवघडू कशाला ?
आलेलो रिक्त मी जाणार रिक्त मी -
हे आहे ते नाही म्हणून कुढू कशाला ?
-उषातनय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा