शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २००९

कवितेत काय ?

सारेच म्हणती
कवितेत काय ?
वेळ वाया जाय
फुकटचा !!
"सरस्वती आहे
ब्रह्म हे अनंत
देव भगवंत
वास करी !!
शोध ईश्वराचा
आहे ही कविता
कवी तुम्ही होता
समजेल !!
कळले तुकाला
ज्ञानाला कळले
'त्यांना 'आकळले
हो वि "ठ्ठ"ल !!
मोक्षाचे साधन
सोपे हो कविता
फिका हो सविता
तिजपुढे !!"
--उषातनय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा