गुरुवार, ५ फेब्रुवारी, २००९

आठवणींची पीसे

वाट त्याच्या येण्याची पाहे पत्नी त्याची नटून !
केसाना गजरा ,लग्नाचा शालू ,भाली कुंकू थाटून !!
सिमेवरुन येणार होता देश रक्षिण्यास गेलेला ,
सोडून सारी नाती गोती पूरा देशाचा झालेला !!
पत्र धाडले होते त्याने परत घराकडे येण्याचे ,
दाराकडे नजर तिची ती चिह्न दिसेना येण्याचे !!
कड़ी वाजली दाराची जोरात पाय धावले
परकाच कोणी दारावरती "हे नाही का आले ?"
टेकून कागद हातावरती तो माघारी फिरला ,
होते लिहिले लढताना जवान शहीद जाहला !!
परतला नाही सिमेवरुन देशासाठी गेलेला ,
कोसळली ती दारात त्या कागद आसवानी ओला !!
मातिसाठी तिच्या कूंकवान केलि संसाराची होळी ,
सूखान रहा म्हणायचा लागेल ग कधीही गोळी !!
''म्हणू नको कधीही तू हे सखयावीण जगू मी कसे ?
जगण्या नवी उमेद देतील आठवणींची पीसे !! ''
------उषातनय

1 टिप्पणी: