शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २००९

अश्विनी आभाळ ...

अश्विनी आभाळ कुणाचं कुणाचं
दसर्याच्या सोन्याच , झेन्डूंच्या रानाच !
आभाळ अश्विनी नाखार्या ऊन्हाच ,
हसर्या पाण्याच , जान्भळ्या मनाच !
आभाळ अश्विनी तुम्बल तुम्बल -
कांद्याच्या वाफ्यातल्या पांण्यान चुम्बल!
आभाळ अश्विनी सजल उजल-
मातीत हिरव निळ पहा ते रुजल !
आभाळ अश्विनी चांदण चांदण -
बंधार्याच्या पाण्यात रातीला गोंदण!
आभाळ अश्विनी पिकांचा जड़े छंद-
पाझरे सईच्या डोळ्यातून आनंद !!
-- उषातनय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा