सोमवार, ९ फेब्रुवारी, २००९

गुलाबास..

आज अंगणात कसा
बाई गुलाब फूलला ,
गार मखमली वारा
संगे घेऊनी झूलला !
गोंडस झाल्यावरती
छान माळीन केसात ,
सावल्या त्या राती जसा
तारा खुले आकाशात !!
पण म्हणते ते मन
तया छळवले किती
आज पर्यंत जीवन
त्याचे मजमूळे माती !!
मूका जीव तरी नित
माझ्यासाठीच झूरला
किती त्रासले तरी तो
जगी परार्थी उरला !!
आनंदात आज त्याला
राहू देइन फांदीशी ,
नाही तोडणार त्याला
नित तोड़ते हो जशी !!
असा गुलाब तो आता
फांदीवरती फुलेल ,
माझ्या केसान्वीन राती
चांदण्याशी तो बोलेल !!
सकाळी सकाळी दव
पान्घरील ती पाकळी
किरण तो गेल्यावर
कशी हसेल मोकळी !!
जेंव्हा थकून जाईल
हळू घेइन त्याजला
आता फेकन्या ऐवजी
छान ठेवीन उशाला !!
-- उषातनय

1 टिप्पणी: