तुम्हा वाटले जरी मी संकटांचा दंश आहे ,
बाबा ! मारू नका मला मी तुमचाच अंश आहे !
वाढणार मजमूळे ना तुमचा वंश आहे ,
भूषविणार जास्त मी तुमचा वन्श आहे !!
स्वतःहाच्या फूलाला कुस्कर्णार तुम्ही का ?
फूलान्वर तुमची हो किती माया आहे ,
जन्मा आधीच जीवन हे हिसकावणार का ?
लेक मी तुमची तुमचीच तर छाया आहे !!
बाबा तुम्ही ठेवाल तशीच राहीन मी
तुमच्या कल्याना आयुष्य वाहीन मी !
अंगनात जरी दुसर्याच्या फुलणार आहे ,
तिथे चांदने तुमचेच तर खुलानार आहे !
बाबा न्यारे सारे मला जग पहायचे आहे ,
ओझे तुमचे मला खरे वहायचे आहे !
हो झेप गरूडाची घेऊनी ऊड़ांयचे आहे ,
जिंकायचे आहे मला हो लढायचे आहे !!
बाबा ठरवा तुम्ही तारायचे की मारायचे आहे ,
मला खूप काही तुमच्यासाठी करायचे आहे !
गोड न्यारे सारे जग मला पण बघायचे आहे ,
बाबा ! मारू नका मला पण जगायाचे आहे !!
--- उषातनय
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा