बुधवार, ४ फेब्रुवारी, २००९

कॉलेजात आवडली...

कॉलेजात आवडली त्याला एक मुलगी होती..

तरीही त्यान तिच्याशी केली ना दिल्लगी होती !!

दुरूनच न्याहाळायचा तो तीच निखळ हसणं ..

बोलण्याचीही ठेवली ना तिच्याशी सलगी होती !!

समजत नव्हते काही, गुंतत होता तिच्यात ..

बनत होती की काय त्याची ती जीवलगी होती !!

वाटायचे खुप त्याला की बोलावे सारे मनातले ...

पण गरिबाचा लेक तो ती श्रीमंताची मुलगी होती !!

- उषातनय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा