शनिवार, ७ फेब्रुवारी, २००९

पानकळी रात ...

सूर्य पांघरून ओढी देई विजेची जांभई !!
पानकळी रात होई गरद जांभळी !!ध्रु !!
ढगांचा बिछाना त्यान पांघरले ढग
भास काळ्या मेंढयान्च्या लोकरिची रग
दिशा दिशा त्या सुर्याला गाते अंगाई !!१!!
अंगणात खेलत कस बागडत मूल
बांधावर गवत तस घेतया झूल
निम्बाच्या स्पर्शा आतुरल्या बाभळी !!2!!
पिम्पळाच्या कुशीत गात टपटप पान
मोहरली माती आनंदल सार रान
थेम्ब थेम्ब मातीतून चंदन उगळी !!३!!
खोद शाल तो कसा डोकावतो खाली
चोरट्या उन्हांत मातीला साद घाली
इंद्रधनुचे स्वप्न रंग सात ऊधळी !!४!!
रानी तू माझ्यासवे वावरात चल
ओन्जलित पावसाचे मोती तू झेल
बिलायताची रानातली माळ ना कळी !!५!!
बंधार्याकड़ कसा वहळ सुटला
झोपलेला सूर्य तिथ जांभळा भेटला
त्या भिजल्या चिंचा बोरी आणिक जांभळी !! ६ !!
--उषातनय







































कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा