सोमवार, ९ फेब्रुवारी, २००९

पान पान ...

पान पान एक एक
गाळत राहीली बोर ,
आंसु तसा एक एक
ढाळत राहीली पोर !!
रणरणत्या ऊन्हासारख
तीच सासर भांडखोर ,
भेगाडलेली माती
न्याहाळाची पोर ----
कधी जमतील ढ़ग ?
कधी नाचेल मनमोर ??
---उषातनय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा