पाहीजे तितक नभातून पाणी पडतच अस नाही
सार काही मनासारख घडतच अस नाही !!
सर्वच गोष्टी त्यासाठी जुळून याव्या लागतात
आशेसाठी अनेक निराशा गिळून घ्याव्या लागतात
पहील्याच प्रयत्नात पाखरू उडतच अस नाही !!
सार काही मनासारख घडतच अस नाही !!
मनाला लागून आपण एवढ घ्यायच नसत
मागच विसरून सार पुढ पुढ जायच असत
हव तितक रसीकाला गाण भिडतच अस नाही !!
सार काही मनासारख घडतच अस नाही !!
घडल नाही मनासारख मन एकट होऊन जात
त्या एका पारव्या सारख दुःखी राहून गात
ठोकलेल प्रत्येक दार उघडतच अस नही !!
सार काही मनासारख घडतच अस नाही !!
असूनही सार काही जीवन घडतच अस नाही !!
मग नसल काही तर काही बिघडतच असनाही !!
सार काही मनासारख घडतच अस नाही !!
पाहीजे तितक नभातून पाणी पडतच अस नाही !!
सार काही मनासारख घडतच अस नाही !!
-उषातनय
mind blowing...write poems on life...it wil b popular
उत्तर द्याहटवा