त्या आंब्याच्या पानावरति ऊन नाचते बाई!!
दौड़त येतो वारा संगीत साचते बाई!! ध्रु!!
पहा कशी चमचम चमकू लागली पाने
नाद मधुर नाजुकसे घूमू लागली गाणे
शब्द उमटले सोनेरी ते मीच वाचते बाई!!१!!
पानांच्या कुशीत कसा मोहोर निजलेला
अंग अंग वारा पुराची गंधुंनी गेलेला
माझ्यासवे का आम्रतरुला गाणे सुचते बाई ? !!२!!
हिरव्या या वृक्षाने न्यारी सजली धराही
झुलत्या पानांची कशी झूलती तर्हाही
कंचन हिरवे रूप तरुचे सर्वाना रुचते बाई !!३!!
त्या आंब्याच्या पानावरति ऊन नाचते बाई!!
दौड़त येतो वारा संगीत साचते बाई !!
_उषातनय
_उषातनय
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा