गुरुवार, १२ फेब्रुवारी, २००९

कशी झाली ....

कशी झाली बाई
वावराची कळा
कोरडा उन्हाळा
बरा होता !
जीवन एवढे
जिवासी उठावे
उन्हात पेटावे
हो त्यापेक्षा !
ऊन ते ऊनच
असते कोरडे
का हो पाणी गडे
घात करी ?
लाख लाख डोळे
ठेऊनी आकांक्षा
बघ ना रे दशा
धरणीची !
-- उषातनय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा