इतके तुझे शब्द भावतात मजला !
तेच पुन्हा लिहायला लावतात मजला !!
त्यांच्यातून होते आकाशात सैर !
मातिवरही तेच ठेवतात मजला !!
तेच पुन्हा लिहायला लावतात मजला !!
मन नभाला लागतात शब्दांच्या धारा !
शारदा गणेश का पावतात मजला !!
तेच पुन्हा लिहायला लावतात मजला !!
पुन्हा पुन्हा वाचतो मी माझ्याच कविता !
त्यातही तुझेच शब्द गावतात मजला !!
तेच पुन्हा लिहायला लावतात मजला !!
_ उषातनय
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा