गं आई तुझ्या प्रेमाची किती आस आहे !
तू नसता यमाचाच प्रत्येक श्वास आहे !!
तुझा वात्सल्य चांद ना दिसला कधी -
लागले का त्याजला ग्रहण खग्रास आहे !!
बाळ तो तुझा राहतो उपाशी भुकेला -
हवासा तो भरविणार कोण घास आहे !!
आभाळ गेले पांगून नाही माती त्याची -
मिळणार सांग त्याला कुणाची कूस आहे !!
फसवीला जातोय पदोपदी जीवनी तो -
नात्यांवर जरी सर्वच ग विश्वास आहे !!
श्रावण त्याच्या आयुष्यातला संपूनी गेला ?
सारा दुर्दैवाचा त्याच्या दुष्काळ ख़ास आहे !!
-उषातनय
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा