मंगळवार, ३ फेब्रुवारी, २००९

पाउस येईल ...

या धरणीला सांगा ना रे पाउस येईल !!
ती जांभळी मैफिल मालकंस गाईल !!ध्रु!!
रुसवा सोड धरे कोपु नको आम्हावरी
आभाळी भरल्या पहा श्रावणी चिम्ब सरी
गारव्याचा तुजसाठी बाहुपाश देईल!!१!!
थेम्ब थेम्ब येईल असा मयूर नाचे जसा
सुगन्धुन वाराही हुरुपेल वेडा नि पिसा
डोळ्यातल्या आसवांना संगतिस नेईल !!२!!
ते डोंगर हिरवे पहा झाड़ झाड़ हिरवे
रुसलेले आनंदून जातील सारे पारवे
गवतांचा नि दवांचा मधुमास राहिल !!३!!
सुमनांचे अलंकार वेलींची मोहनमाळ
किरणांनी हळव्या चमकेल तुझे भाळ
'त्याच्या' सवे नाह्ण्याची तिचीही हौस होईल !!४!!
उत्साहाच्या भरात थकवा जाइल तुझा
तुला फूलवाया येणार अम्बराचा तो राजा
वाहणारे सारे पाणी पुरावा ठोस राहील !!५!!
_ उषातनय


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा