बुधवार, ११ फेब्रुवारी, २००९

आज पुन्हा...

आज पुन्हा पहिल्या भेटीचा होतोय आभास !
तसेच राणी पाठीवर सोड मोकळे केस !!
भिजलो होतो पावसात तूझ्या सवे हर्षाने ,
वाटे पुन्हा तो लागला प्रेमाचा श्रावण मास !!
धुंद रात होती ब्रह्म कमळाना बहर तो ,
आजही तो हुन्गू दे ब्रह्मकमळांचा सुवास !!
डोळयात पहा तू माझ्या मिसळूनिया डोळे ग ,
एकरूप होवू दे माझ्या श्वासाला तुझा श्वास !!
गुलाबाच्या छटा साऱ्या गालावर उमटू दे ,
लाजूनिया तशीच ग डोळयात गुलाबी हास !!
माझ्यासाठी ह्वावी तुझ्या केसांची घनेरी रात ,
स्वप्नातही फिरू दे हळू त्यांचीच मोरपीस !!
अल्गदची तू येना मग माझीया बाहूंत ,
अनूभऊ पुन्हा तो पहील्या भेटीचा पाऊस !!
--- उषातनय

1 टिप्पणी: