माझ्या जीवन कवितेला प्रेरणा देणारे श्री. प्रसाद पवार व सौ. कामिनी पवार आणि सहकार्य करणारे अरविंद जगताप यांना...© 2009,prashant kendale
शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २००९
मातीच सूत्र ..
गुरुवार, २६ फेब्रुवारी, २००९
सारं काही मनासारख ..
सार काही मनासारख घडतच अस नाही !!
सर्वच गोष्टी त्यासाठी जुळून याव्या लागतात
आशेसाठी अनेक निराशा गिळून घ्याव्या लागतात
पहील्याच प्रयत्नात पाखरू उडतच अस नाही !!
सार काही मनासारख घडतच अस नाही !!
मनाला लागून आपण एवढ घ्यायच नसत
मागच विसरून सार पुढ पुढ जायच असत
हव तितक रसीकाला गाण भिडतच अस नाही !!
सार काही मनासारख घडतच अस नाही !!
घडल नाही मनासारख मन एकट होऊन जात
त्या एका पारव्या सारख दुःखी राहून गात
देवा ..!!
तू असशील लक्ष्मी -
तर सोन्याची नाणी दे ,
पोटासाठी !!
देवा !!
तू असशील नभ -
तर मनसोक्त पाणी दे ,
ओठासाठी !!
देवा !!
तू असशील शब्द -
तर गोड गोड गाणी दे ,
चित्तासाठी !!
मंगळवार, २४ फेब्रुवारी, २००९
मी वृत्तांना ..
तिचा वळिवाचा पाऊस ..
सोमवार, २३ फेब्रुवारी, २००९
रसीकांचा कवी..
शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २००९
ज्यावेळेस..
अश्विनी आभाळ ...
गं आई !
जांभळी पिकल्या सये..
मी पाण्याच्या ...
तसाच तो शेतकर्याच्या जातीतला ..
पाटाला आलं पाणी ...
कवितेत काय ?
गुरुवार, १२ फेब्रुवारी, २००९
आवडते कवयित्रे..
आपलेच दात आपलेच ओठ ..
कशी झाली ....
पाऊस पडतो बाई ...
बुधवार, ११ फेब्रुवारी, २००९
माझ्यासाठी कविता ...
गायकी ..
तेव्हा तेव्हा माझी कविता 'गायकी 'वाढली होती !!!
---- उषातनय
आज पुन्हा...
मंगळवार, १० फेब्रुवारी, २००९
माझी कविता
ज्या मातीत ...
बाबा मारू नका मला ...
सोमवार, ९ फेब्रुवारी, २००९
विचारायच राहून ...
पान पान ...
गुलाबास..
शनिवार, ७ फेब्रुवारी, २००९
पानकळी रात ...
कविता खोल खोल
कविता खोल खोल मनातून येते !!
वातानुकूलित खुराड्याना ताला लावित
ती महानोर दादांच्या रानातून येते!!
आई प्रेम पान्हा तान्ह्याला पाजीते -
जीवनामृत दूध तिच्या स्तनातुन येते !!
सुखातून, दुःखातून , चिन्तनातुन येते
ती तर भोवातालाच्या जनातून येते !!
कविता खोल खोल मनातून येते !!
-- उषातनय
पिम्पळ
कौठीना रडू आल !!
पिम्पळावरल त्यांच प्रेम -
कौठातुनाच पडू आल !!
--- उषातनय
खस्ता...
निसटायच धोरण पाळल होत !
हळहळताना !
धडपड़टाना !
खात असताना , खस्ता !
तीचा आत्माही म्हणतो आता !!
येइल त्याला घर ,जाइल त्याला रस्ता !!
-- उषातनय
गुरुवार, ५ फेब्रुवारी, २००९
आठवणींची पीसे
ती !!!
माझ्या प्रेम कवितांची तीच भिस्त आहे !!
----------उषातनय
प्रेमाच नात
बुधवार, ४ फेब्रुवारी, २००९
साराच दुष्काळ...
सखीचे शब्द...
चुकतं कुणाचं...?
कॉलेजात आवडली...
कॉलेजात आवडली त्याला एक मुलगी होती..
तरीही त्यान तिच्याशी केली ना दिल्लगी होती !!
दुरूनच न्याहाळायचा तो तीच निखळ हसणं ..
बोलण्याचीही ठेवली ना तिच्याशी सलगी होती !!
समजत नव्हते काही, गुंतत होता तिच्यात ..
बनत होती की काय त्याची ती जीवलगी होती !!
वाटायचे खुप त्याला की बोलावे सारे मनातले ...
पण गरिबाचा लेक तो ती श्रीमंताची मुलगी होती !!
- उषातनय
मंगळवार, ३ फेब्रुवारी, २००९
आपण
आपल्याच माणसांना
टाळत असतो आपण !
परक्याना जाउन
मिळत असतो आपण !!
परक्याना कितपत
कळत असतो आपण !!
तेव्हा आपल्याच मात्र
आकळत नसतो आपण !!!
_उषातनय
त्या आंब्याच्या पानावरति
त्या आंब्याच्या पानावरति ऊन नाचते बाई!!
दौड़त येतो वारा संगीत साचते बाई!! ध्रु!!
पहा कशी चमचम चमकू लागली पाने
नाद मधुर नाजुकसे घूमू लागली गाणे
शब्द उमटले सोनेरी ते मीच वाचते बाई!!१!!
पानांच्या कुशीत कसा मोहोर निजलेला
अंग अंग वारा पुराची गंधुंनी गेलेला
माझ्यासवे का आम्रतरुला गाणे सुचते बाई ? !!२!!
हिरव्या या वृक्षाने न्यारी सजली धराही
झुलत्या पानांची कशी झूलती तर्हाही
कंचन हिरवे रूप तरुचे सर्वाना रुचते बाई !!३!!
त्या आंब्याच्या पानावरति ऊन नाचते बाई!!
_उषातनय
सूर्य जिंकुन ये
चंद्र जिंकुन ये
स्वर्गासाठी तुझ्या
इन्द्र जिंकुन घे !!ध्रु!!
कोर कोर सखे
नभ जिंकुन ये
तिथं लिहायला
समुद्र जिंकुन घे !!१!!
दिशा जिंकुन ये
निशा जिंकुन ये
चांदण्यानाच तू
त्या लपेटून घे !!२!!
निळं हिरवं तू
रान जिंकुन ये
जाशील जिथं तू
मन जिंकुन ये!!३!!
_ उषातनय
पान कळयात
तेव्हा त्याच्या दुष्कालाचा अर्थ त्याला कळत असे...
_ उषातनय
पाउस येईल ...
ती जांभळी मैफिल मालकंस गाईल !!ध्रु!!
रुसवा सोड धरे कोपु नको आम्हावरी
आभाळी भरल्या पहा श्रावणी चिम्ब सरी
गारव्याचा तुजसाठी बाहुपाश देईल!!१!!
थेम्ब थेम्ब येईल असा मयूर नाचे जसा
सुगन्धुन वाराही हुरुपेल वेडा नि पिसा
डोळ्यातल्या आसवांना संगतिस नेईल !!२!!
ते डोंगर हिरवे पहा झाड़ झाड़ हिरवे
रुसलेले आनंदून जातील सारे पारवे
गवतांचा नि दवांचा मधुमास राहिल !!३!!
सुमनांचे अलंकार वेलींची मोहनमाळ
किरणांनी हळव्या चमकेल तुझे भाळ
'त्याच्या' सवे नाह्ण्याची तिचीही हौस होईल !!४!!
रविवार, १ फेब्रुवारी, २००९
ज्योतिबा सावित्री
उजळल्या सर्व रात्रि !
देश ज्योतिबा ज्योतिबा
झाला सावित्री सावित्री !!
_ उषातनय
ओपन मधला दलीत...
रोज रोज स्वप्नांचे होते ज्याच्या जळीत आहे
तसा तो-तो ही एक ओपन मधला दलीत आहे !!
पणजाआजानही कधी केली नाही शिरजोरी
पिढ्यान पिढ्या चाललीय मरणाची मजुरी
नशीब ही तसे लोकांच्या जळते चुलीत आहे !!
तसा तो-तो ही एक ओपन मधला दलीत आहे !!
कर्ज आलं उराशी गावशीव सारच सुटलं
काळजाच्या माणसाचं माणूस पण आटल
शहरात या जिव्हाळ्याचा श्वास धुंडाळीत आहे !!
तसा तो-तो ही एक ओपन मधला दलीत आहे !!
भ्रष्टचारी व्यवस्थापनाचा आजार झाला
जिकडं तिकडं नुसता गन्दा बाजार आला
धडपडतोय पुढं जायला आतडी पिळीत आहे !!
तसा तो-तो ही एक ओपन मधला दलीत आहे !!
श्रीमन्तांना वाटतं यानं हव थूकलेलं चाटायला
माणूसच आहे तो त्यांना लाज हवी वाटायला
रोजंदारी द्यायला धनिक ही टाळीत आहे !!
तसा तो-तो ही एक ओपन मधला दलीत आहे !!
इथ पैशाची च जात मोठी त्याचाच धर्म मोठा
भाकरी पर्यंत पोहोचायच्या हरवल्या वाटा
दिल्ली त सोडा ना त्याचा कैवारी गल्लीत आहे !!
तसा तो-तो ही एक ओपन मधला दलीत आहे !!
समज आल्यावर धर्म कळला जात कळली
गरीबीच माय आपली ही खरी बात कळली
त्याच्या वेदनांचे संविधान अजुन ही वाळीत आहे !!
तसा तो-तो ही एक ओपन मधला दलीत आहे !!
-- उषातनय
तू जेव्हा बोलते ...
वाहत जावेसे वाटते तू जेव्हा बोलते !
तुझ्या डोळ्यातून पडतो पाउस असा ...
नाहत जावेसे वाटते तू जेव्हा बोलते !
तूझा एक एक शब्द असा ग सखये ...
लिहित जावेसे वाटते तू जेव्हा बोलते !
रागवलिस लटकेच कधी तू ...
साहत जावेसे वाटते तू जेव्हा बोलते !
_ उषातनय