बंध तुझा माझा जणू
दवे तृण ओलावला ,
चंद्र प्रकाशानही तो
बाई येवून न्हानला !!
आली डोळ्यात चमक
दवा तृणाची झलक
लाजे केसात गजराशहारे चोळी घागरा
गालावर लालीलाल
रंग प्रेमाला ग आला !!१!!
भेट बरसून आली
रात शरमून गेली
हळू चंद्राच्या कानात
शुक्र चांदणी म्हणाली
तसे साजणा तुम्हीही
जवळी घ्याना मजला !!२!!
मिठी सुटता सुटेना
दूर जावेसे वाटेना
पहाट करण्यासाठी
आता सूर्यही भेटेना
मधु चंद्रामधी नभीका तो चांदही गुंतला ?!!३!!
- उषातनय
he ek sundar pranay geet aahe
उत्तर द्याहटवाmalaa khup aavdale