सोमवार, २ मार्च, २००९

रस्ता मळ्याचा

घराकड़ जातो पायी-पायी उठता बसता


चिंचेचा,बोराटीचा अन् बाभळीचा रस्ता !



लागतो मळ्यात झुकझुक रूळ ओलांडून


हो कशी उडते धूळ , राही माती धडधडून


ओढ़ लागते घराची घाम पुसता पुसता

चिंचेचा,बोराटीचा अन् बाभळीचा रस्ता !

आंब्याची झाडं कुठं ती निम्बाची लहांग


मधिच लागते कुठे हो साबरिची रांग


सुरकन सरकत्या खारी दिसता दिसता !
चिंचेचा,बोराटीचा अन् बाभळीचा रस्ता !



'' संकटापासून रस्ता ठेव देवा नेटका ''


म्हसोबाच्या पायापाशी थाम्बे एक घटका


वाटावरल्या मळ्यात कुशलही पुसता पुसता !
चिंचेचा,बोराटीचा अन् बाभळीचा रस्ता !



घराकड़ जातो पायी-पायी उठता बसता
चिंचेचा,बोराटीचा अन् बाभळीचा रस्ता !


-उषातनय




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा