या त्यांच्या प्रश्नान त्याच्या मनात यायचे -
आहे प्रश्न चांगला काय उत्तर द्यायचे ?
सांगू मी यांना काय मला कोण व्हायचे ?
देवही नाही ना दानव व्हायचे
खूप काही करायचे खूप काही व्हायचे
पण पहिल्यांदा मला मानव व्हायचे !!
माणसाला माणुसकी नाही ही आहे माणुसकीची खंत !
मानावताच परम धर्म नित वदले ऋषी महात्मे संत !!
जन्म झाला म्हणजे जगाव लागत
पोटाच खळग सर्वानाच भराव लागत ,
काहीना इथ गरीबीतच समाधान मानाव लागत
तर जागता जागता काहीना आभाळपण येत
आभाळपण आल म्हणुन फुगायच नसत
सागराला कधीही भूलायाच नसत
सगळ निघून जात सार काही संपत
आपल हवेत उड़न का जन्माला पुरत ?
आभाळानही आभाळपण सोडायच असत
सागराला मनसोक्त भिडायच असत
नात कधी कुणाशी तोडायच नस्त
माणसाशी माणूस नेहमी जोडायच असत !!
रक्ताच नात इथ अनेकदा फोल ठरत
मानुसकिच नात मनाहूनाही खोल ठरत
मानवतेचे गीत नव नव गायचे !!
पहिल्यांदा प्रत्येकान मानव व्हायचे !!
आपल्याला जमेल तितक कराव
इतिहासी झळकाव
जमल नाही काही चांगल माणूस नक्की व्हाव ,
कारण इत सगळ काही मिळत सगल काही होत
जगता जगता फ़क्त माणूस होण राहून जात !!
कशाला भांडायच ? कशाला लढायच ?
कशाला कुणाच रक्त काढायच ?
मानवतेचा संदेश एखाद्या मनापर्यंत जरी नेला -
नाही म्हननार कोनी "जन्मा आ़ला हेला पाणी वाहता वाहता गेला !"
म्हणतील लोक जन्म झाला
चांगला जगाला जरी जग सोडून गेला -
पण जाता जाता माणसाशी माणूस तर जोडून गेला !!
---- उषातनय
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा