बुधवार, १५ एप्रिल, २००९

कवी ग्रेस व उषातनय

दि.७व८ मार्च रोजी स्टूडिओ एनकाउंटर येथे .........नासिक २००९

कवी ग्रेस यांच्यासोबत ...

श्री .प्रसाद पवार ,सौ .कामिनी पवार , समीर कुलकर्णी ......उषातनय

..........


...मुलांनी केलेली गर्दी


छन्द वर्गाचे विद्यार्थी ...व उषातनय


इन पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल ...


रविवार, १२ एप्रिल, २००९

उषातनय .... सायनिंग अँन ऑटोग्राफ...


एकपात्री प्रयोगात कविता सादर करताना ...

गटारातील कळीला पण फुलायच होत ..
आभाळाला झोका टांगून झुलायच होत ..
राज बागेतल्या कळीसारख डुलायच होत ..
न बोलताच खूप काही बोलायच होत ...
त्याकळीसारखा प्यायचा होता तिलाही वारा
मनसोक्त लुटायाचा होता सूर्य किरण सारा
पण राज माळ्या सारखा नव्हता तिला आधार
गटारातिल कन्या ती केवळ निराधार
परीमळी सख्यांचा हवा होता सहवास
पण एकट एकट आयुष्य ...तिचा होईल तसाच र्हास?
वाढता -वाढता जाई राज बागेत नजर
वाटल राज बागेतली राजेश्वरी मीही असते जर ?
दुर्गन्धीतही कस्तुरीसारख दरवळायच होत..
वादळ सार मनातल उधळायच होत ...
गटारातील कळीलापण फूलायच होत ॥
रातीच्या चांदण्या ती न्याहाळायची
अन् उरातल्या उरात स्वतःशीच हळहळायची -
त्या नभीच्या तार यातही खुलायच होत
आभाळाला झोका टांगून झुलायच होत
गटारातील कळीलापण फूलायच होत...
राजकन्या असावी ना अशीच ती होती
काळजा काळजा वर ठसावी अशीच ती होती ...
पण काहींनाच कळली तिची किंमत
सर्व जगाशी लढण्याची हिम्मत !
एकदा पहाता पहाता स्वप्न नवकोट नारायणी बनन्याच
तीच्या अभागी दुःख कुणाच्या पायदळी तुडण्याच ,
जणू कायमच्याच मरण्याच
मग काय गटारातील कळी तिथच निपचीत पडली
आकांत करून गुमान ढसाढसा रडली ....
स्वप्न ते तिचे स्वप्नच राहील का ?
गटारातील कळी कधी राज सुमन होईल का ?
कुणी ऐकेल का तिची ती अबोल भाषा ?
का जीवनात फ़क्त गटारलेल्यांसाठी स्वप्न ?
खोटया त्यांच्या आशा अभिलाषा ?
निराशा ? निराशा ?निराशा ?
-उषातनय

परिचय करताना समीर कुलकर्णी सर ,प्राचार्य ठोके सर व उषातनय


कविता सादर करताना ..सोबत कवी रविन्द्र मालुन्जकर


छंद वर्गाचे उद्घाटन करताना ,पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल


पोर्जे क्लासेस इथे कवितेस मिळालेला प्रतिसाद ...




रविवार, ५ एप्रिल, २००९

तिला पाहिल्यावर ...

तिला पाहिल्यावर मी मलाच विसरून जातो ,
शब्दमेघ माझ्यातला धुवांधार बरसून येतो !!
-उषातनय

कर्जान ..

कर्जान बापाची वणवण झाली -
फुलासारखी माय माझी कोमेजून गेली !!
-उषातनय

किती तरी ..

किती तरी गळ्यांनी
माझी कविता साठवली मनी-
शब्दानी कुबेर मी टाळ्यांचा झालो धनी !!
-उषातनय

बुधवार, १ एप्रिल, २००९

शेतशाळा

बिना बापाच्या पोरींची

काय होणार हो शाळा ,

शेतात आई माग राबताना

त्यांच आयुष्य झाला मळा !!


शाळेशी मनातून नात

सुट्ट सुट्ट होत गेल ,

तिच्या हातात खुरप

घट्ट घट्ट होत गेल !!


लांडग्यांच्या या जगात

आईन मुक्त वावरू दिल नाही ,

म्हणून त्यांच्यातल पाखरू

फारस उडत झाल नाही !!


पतीच्या घरी मन अंगही तसच जळू लागल ,

सासर माहेर असत खर काय ते आता कळू लागल !!

ती भरत राहीली पाणी
तरी सार रान करपत गेल ,
सुखच तेह्वा वाटल
आसवातून झिरपत गेल !!
मोठ्या बापाची लेक
अशा घरात नांदली नसती ,
असता बाप तिला जर
त्यान अशा घरात दिला नसती !!
तिची 'शेतशाळा 'झाली नसती -
तिला जड़ फार गेल असत ,
जीवघेण्या उन्हात तेव्हा
पावसात कोणी नेल असत ?
-उषातन