रणरणत्या ग्रिष्मातही रिमझीम श्रावण होत ,
खपत्या आईबापामूळे फूलत त्याचं जीवन होत !
नव्हती कशाची चिंता होत किती लाड होते -
आईबापाचे प्रेम जणू कल्पाचे ते झाड़ होते !
बापाच्या हाताला घट्टे -आईच्या पायाला भेगा,
त्याच्यासमोर दाखवून नाही रडले कधी उगा !
मोठ मोठ होताना काही उणीवा येत गेल्या -
त्या त्याला त्याच्या कर्तृत्वाच्या जाणीवा देत आल्या !!
-उषातनय